Majhi Ladki Bahin Yojana 2024: माझी लाडकी बहीण योजना अर्जप्रक्रिया, स्टेटस आणि यादी पहा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र शासनामार्फत समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी राज्यपातळीवर विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि महाराष्ट्रातील नागरिकांना त्याचा लाभही मिळतो. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वय वर्ष वयोगटातील मुली व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana – माझी लाडकी बहीण योजना काय आहे

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील मुलींना व महिलांना
दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम लाभ स्वरूपात दिली जाणार आहे.

राज्य व विभागमहाराष्ट्र, महिला व बाल विकास विभाग
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
पात्रता२१ ते ६५ वयोगटातील मुली व महिला
योजनेचा प्रारंभ१ जुलै, २०२४
अर्जप्रकियेस सुरुवात१ जुलै, २०२४
अर्जाची अंतिम मुदत३१ ऑगस्ट, २०२४
लाभाची रक्कम१,५०० दरमहा
देय दिनांकमहिन्याच्या १५ तारखेपर्यंत
वेबसाइटhttps://ladakibahin.gov.in/

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि आर्थिक स्वालंबनासाठी नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा श्रम सहभाग कमी असलयामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे गरजेचे असते ज्यामुळे त्यांची कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मदत होते.

  • १) माझी लाडकी बहीण योजना राबवून राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • २) महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • ३) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
  • ४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
  • ५) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असेल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशा महिला पात्र असतील :

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, आणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण अपात्र असेल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशा महिला अपात्र असतील :

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक ऊपन्न रु.२.५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि रु.२.५० लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी पात्र ठरतील.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे दरमहा रु.१,५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/ बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष /उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर सोडून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • १) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन केलेला अर्ज.
  • २) आधार कार्ड.
  • ३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आणि हे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षापूर्वीचे १. रेशनकार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचा दाखला यांच्यापैकी कोणतेही एक डॉक्यूमेंट.
  • ४) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत), पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
  • ५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • ६) पासपोर्ट साईज फोटो.
  • ७) रेशनकार्ड.
  • ८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जप्रक्रिया

१ जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा मोबाइल ऍपद्वारे अथवा सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.

नवीन ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करण्यासाठी खालील फोटो वर क्लिक करा

त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणतीही महिला Majhi Ladki Bahin Yojana 2024 साठी पात्र असेल तर तुम्ही खालील माहितीप्रमाणे अर्ज करू शकता.

वरती दिलेल्या पात्रता निकषानुसार ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) , सेतू सुविधा केंद्र यांच्यापैकी कोणत्याही केंद्रा मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती दिली जाईल.

Majhi Ladki Bahin Yojana 2024 साठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

  1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  2. स्वतःचे आधार कार्ड

जर तुम्ही Majhi Ladki Bahin Yojana Link शोधात असाल तर तुम्ही योग्य पेज वरती आला आहेत, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित सर्व माहिती आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पोर्टल विषयी व Majhi Ladki Bahin Yojana App विषयी माहिती देणार आहोत.

Majhi Ladki Bahin Yojana Portal

महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन बरोबर ऑनलाईन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज हे स्वतः अर्जदार महिला भरू शकतात किंवा नजीकच्या सेतू सुविधा केंद्राद्वारे भरू शकतात. ऑफलाईन भरलेले अर्ज देखील नंतर संबंधित केंद्रातून ऑनलाईन पूर्ण केले जातात.

majhiladkibahin maharashtra gov in Portal

majhiladkibahin maharashtra gov in portal हे 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे.

ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेत

पोर्टल लिंक – https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Majhi Ladki Bahin Yojana App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऍप द्वारेही स्वीकारले जातील असं जीआर मध्ये सांगितलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने Majhi Ladki Bahin Yojana App अधिकृतपणे जाहीर केलेले आहे. या योजनेसाठी नारीशक्ती दूत Narishakti Doot हे ऍप लाँच केलेले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म आणि हमीपत्र PDF डाउनलोड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्वच महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य नसल्यामुळे शासनाने ऑफलाईन अर्ज प्रक्रियेचा पर्याय ठेवलेला आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतः फॉर्म आणि हमीपत्र भरून संबंधित केंद्रामध्ये जमा करू शकता.

सध्यातरी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु नाही त्यामुळे ऑफलाईन अर्ज करून योजेनचा जलद लाभ घेता येऊ शकतो. ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट आणि हमीपत्राची प्रिंट काढून घ्यावी लागेल.
नंतर त्यामध्ये आपली अचूक माहिती भरून ते योग्य त्या शासकीय कार्यालयात किंवा नमूद केलेल्या यंत्रणेकडे सोपवावे लागेल.

फॉर्म PDFDownload
हमीपत्र PDF Download

वरील दोन्ही लिंक पैकी कोणत्याही एका लिंक वरून पीडीएफ स्वरूपातील फॉर्म डाउनलोड करून घ्यावा. फॉर्म च्या खालील पेज वरतीच हमीपत्र दिलेले आहे, त्यामुळे कोणत्याही एका लिंक वरून डाउनलोड करू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana List – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्रता निकष दिलेले आहेत त्यानुसार सर्व पात्र महिलांनी आपले अर्ज दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावे. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पैकी कोणत्याही सोयीस्कर प्रक्रियेने केले जाऊ शकतात.

तात्पुरत्या यादीचे प्रकाशन :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/ऐप वर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र / ग्रामपंचायत/वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.

आक्षेपांची पावती :-

जाहीर होणाऱ्या यादीवरील हरकत पोर्टल/ऐप द्वारे प्राप्त केल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका/मुख्यसेविका / सेतू सुविधा केंद्र यांचेमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत / तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाईन ) प्राप्त झालेल्या हरकत/तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील.

पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या काही दिवसांपर्यंत सर्व हरकत/तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.
म्हणजे ज्यांचे नाव पात्रता यादीत आले नसेल किंवा काही समस्या येत असतील त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील.
प्राप्त हरकतीचे निराकरण संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील गठीत केलेल्या तक्रार निवारण समिती द्वारे केले जाईल.

अंतिम यादीचे प्रकाशन :-

तक्रार निवारण समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यासाठी कालावधी असेल. अशाप्रकारे हि प्रक्रिया पार पडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. पात्र / अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र अंतिम यादी अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वॉर्ड स्तरावर / सेतू सुविधा केंद्र, तसेच पोर्टल/ॲपवर देखील जाहीर केली जाईल.

लाडकी बहीण योजना रिजेक्ट होण्याची कारणे:

तर काही जिल्ह्यात पूर्ण फॉर्म approved झाले आहेत काही जास्त छाननी केली गेली नाही.

  • 1) जॉइट अकाऊंट चालत नाही रिजेक्ट .
  • 2) हमीपत्र वर खाडा खोड चालत नाही रिजेक्ट
  • 3) आधार आणि बँक लिंक नसेल तरी पण रिजेक्ट
  • 4) डॉक्युमेंट नीट दिसत नाही रिजेक्ट
  • 5) राशन कार्ड नीट दिसत नाही.
  • 6) आधार ची माघची व पुढची बाजू जोडले नाही रिजेक्ट .
  • 7) आधार वर पूर्ण जन्म तारीख नाही रिजेक्ट
  • 8) फॉर्म मराठी मध्ये भरला रिजेक्ट – काही जिल्ह्यात reject केले आहेत.
  • 9) आधार वरचे नाव व पासबूक चे नाव सारखे नाही रिजेक्ट
  • 10) राशन कार्ड मध्ये नाव नाही रिजेक्ट

या कारणामुळे बरेच फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, त्यामुळे फॉर्म नीट भरा सर्व माहिती तपासा, आणि डॉक्युमेंट ओरिजनल स्कॅन करा ज्यांना रिजेक्ट sms आला आहे त्यांनी फॉर्म परत नीट भरा.