लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या आणि उपाय

लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या: राज्य शासनाने माझी लाडकी बहिण योजना eKYC प्रक्रिया सुरु केली आहे. काही लाभार्थ्यांनी चुकीची माहिती भरून, तर काहींनी अपात्र असताना देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे ती नावे कमी करण्यासाठी e-KYC प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. इ केवायसी केल्यामुळे शासनाला बोगस लाभार्थी, अपात्र लाभार्थी यांची माहिती मिळेल आणि त्यांना इथून पुढे मिळणार लाभ बंद होईल. त्यामुळे सर्वजण आता ekyc करत आहेत आणि त्यांना ekyc करताना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पोस्ट च्या माध्यमातून आपण येणाऱ्या समस्यांचे कारण आणि समाधान जाणून घेणार आहोत.

अशाप्रकारे e-KYC करा १००% सक्सेसफूल होईल

लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या

माझी लाडकी बहिण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या

अशाप्रकारे e-KYC करा १००% सक्सेसफूल होईल

Unable to send OTP

लाडकी बहीण योजना eKYC करताना सर्वात जास्त लोकांना येणारी समस्या म्हणजे “Unable to send OTP“. खूप सारे यूजर्स या समस्येमुळे eKYC करू शकले नाहीत. हि समस्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक आता eKYC करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे सर्वर वर जास्त लोड येतो आणि “OTP” पाठवला जात नाही.

Unable to send OTP अशी समस्या जर तुम्हाला पण येत असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळी उशिरा किंवा सकाळी लवकर eKYC करण्याचा प्रयत्न करा तुमची eKYC यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही

काही महिलांना “सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही” असा एरर मेसेज येत आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या मध्ये अशी समस्या येत असेल तर याचा अर्थ तुमचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळले गेले आहे.
तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालेला आहात याचे कारण काहीलपैकी असू शकते:

  • तुमच्या घरामध्ये ४ चाकी वाहन असेल.
  • तुमच्या घरामध्ये ITR भरणारी व्यक्ती असेल.
  • तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त असेल.
  • एका घरामध्ये २ पेक्षा अधिक महिला लाभार्थी असतील.
  • किंवा तुम्ही इतर कोणत्याही पात्रता निकषात बसत नसाल.

पती किंवा वडील कोणाचा आधार क्रमांक टाकायचा

खूप साऱ्या महिलांना खास करून ज्यांचे नवीन लग्न झालेलं आहे अशा महिलाना लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या पैकी मुख्य म्हणजे पती किंवा वडील कोणाचा आधार क्रमांक टाकायचा. कारण काही महिलांनी योजनेचा लाभ घेताना वडिलांचा आहार क्रमांक टाकलेला परंतु आता त्यांचे लग्न झाले असेल. तर याच खूप सोपं उत्तर आहे:
तुमच्या आधार कार्ड वर ज्याचं नाव असेल त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे.

माझी लाडकी बहिण योजना eKYC शेवटची तारीख

माझी लाडकी बहिण योजना eKYC प्रक्रिया सप्टेंबर मध्ये सुरु झालेली आहे. शासनाने अधिकृत संकेतस्थळावर eKYC प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी असे सांगितले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना संपेपर्यंत तुम्ही तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून तुमहाला कोणत्याही अडचणींना समोर जावं लागणार नाही.

लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या FAQ

लाडकी बहीण योजना e-KYC नाही केली तर काय होईल?

जर तुम्ही e-KYC केली नाही तर तुम्हाला मिळणारा योजनेचा लाभ बंद होईल.

माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करायची?

ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जाऊन eKYC करता येईल.

पती किंवा वडील कोणाचा आधार क्रमांक टाकायचा?

तुमच्या आधार कार्ड वर ज्याचं नाव असेल त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे.

1 thought on “लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या आणि उपाय”

  1. वडील आणि पति दोघे हयात नाहीत आणि 2009 आणि 2006 ला ते ‌वारलेत, आधार कार्ड तेव्हा नवते मग काय करायच ते पण सांगायच न

    Reply

Leave a Comment