लाडकी बहीण योजना e-KYC: अखेर राज्य शासनाने माझी लाडकी बहिण योजनेसाठी eKYC प्रक्रिया सुरु केली आहे. खूप दिवसांपासून सोशल मीडिया मध्ये चर्चा सुरु होती कि या महिलांचे अर्ज बाद झाले वगैरे वगैरे. परंतु आता e-KYC द्वारे जे पात्र नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल. कारण काही लाभार्थ्यांनी चुकीची माहिती भरून, तर काहींनी अपात्र असताना देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ बंद व्हावा यासाठी e-KYC प्रक्रिया करणे बंधनकारक केली आहे.
आपण या पोस्ट च्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीची e-KYC कशाप्रकारे यशस्वीरीत्या पूर्ण करू शकता ते जाणून घेणार आहोत.

लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रिया
खाली दिलेली माहिती व्यवस्थित वाचूनच स्टेप बाय स्टेप लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रिया
सुरु करा:
स्टेप १. वेबसाईट उघडा
👉या महिलांनी e-KYC केली तर चालूचे ₹1500 पण बंद होतील!👈
तुमच्या मोबाईल मध्ये शासनाची लाडकी बहीण योजना e-KYC करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट ओपन करा लिंक खाली दिलेली आहे:
https://ladakibahin.maharashtra.gov.in
links
लाडकी बहीण योजना online e-KYC लिंक
स्टेप २. लाडकी बहीण योजना e-KYC सुरु करा.
वेबसाईट वर आल्यावर eKYC करा या बटणवर वर Click करा.
स्टेप ३. महिलेचा आधार क्रमांक टाका.

आता तुमच्या स्क्रीन वर eKYC फॉर्म उघडेल (वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे).
आता ज्या महिलेची e-KYC करायची आहे तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे व Captcha मध्ये बाजूला जे अंक/अक्षर दिसत आहेत ते जसेच्या तसे टाकायचे.
आधार प्रमाणीकरणासाठी खाली दिलेल्या “मी सहमत आहे” याच्यासमोर टिक करायचे आहे व OTP पाठवा बटणावर Click करा.
स्टेप ४. OTP टाका
लाभार्थ्याच्या (Aadhar linked) मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून Submit बटणावर Click करा.
स्टेप ५. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका.
तुमच्या आधार कार्ड वरती जर पतीचे नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका आणि जर वडिलांचे नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका व Captcha मध्ये बाजूला जे अंक/अक्षर दिसत आहेत ते जसेच्या तसे टाकायचे.
आधार प्रमाणीकरणासाठी खाली दिलेल्या “मी सहमत आहे” याच्यासमोर टिक करायचे आहे व OTP पाठवा बटणावर Click करा.
स्टेप ६. OTP टाका
पतीच्या / वडिलांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून Submit बटणावर Click करा.
स्टेप ७. लाभार्थ्याची जात निवडा.

आता तुमच्या स्क्रीन वर शेवटच्या स्टेप साथीचे पेज ओपन झाले आहे (वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे). डाव्या बाजूला ज्यांचा आधार क्रमांक टाकलेला (वडिलांचा किंवा पतीचा) त्यांचे नाव दिसेल.
आता महिलेचा जात प्रवर्ग निवडा.
स्टेप ८. होय का नाही निवडा.
डाव्या बाजूला विचारले आहे त्याचा अर्थ असा होत कि तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती पेन्शन घेत नाही किंवा सरकारी कर्मचारी नाही हे खरे आहे का? जर हे खरे असेल तर “होय” पर्याय निवडा (“नाही” निवडले तर योजनेचा लाभ बंद होऊ शकतो).
उजव्या बाजूला विचारले आहे त्याचा अर्थ असा होतो कि तुमच्या कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच व्यक्ती लाभ घेत आहेत हे खरे आहे? इथेपण “होय” हाच पर्याय निवडावा जर तुम्ही “नाही” पर्याय निवडला तर योजनेचा लाभ मिळणे बंद होऊ शकते.
शेवटच्या बॉक्स मध्ये टिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
👉या महिलांनी e-KYC केली तर चालूचे ₹1500 पण बंद होतील!👈
कोणतीही अडचण आल्यास खालील लिंक वर क्लिक करा तुम्हाला त्याचे सोल्युशन मिळेल.
जर तुम्हाला खालील पैकी कोणतीही अडचण आली असेल तर वरील लिंक वर क्लिक करा:
- वेबसाईट ओपन होत नाही.
- Unable to send OTP
- पती किंवा वडील कोणाचा आधार क्रमांक टाकायचा.
- सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही.

All Pdfs are useful
हि नवीन लिंक आहे ladakibahin.gov.in
मी या लिंक वरून EKYC केली आहे ladakibahin.maharashtra.gov.in