Majhi Ladki Bahin Yojana List 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी

Majhi Ladki Bahin Yojana List: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे, सुरूआतीइन ल ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरले गेले नंतर शासनाने नारी शक्ती दूत ऐप च्या माध्यमातून अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आणि आता १ ऑगस्ट पासून ladki bahin.maharashtra.gov.in या पोर्टल च्या माध्यमातून अर्ज सुरु केले. त्यामुळे राज्यामध्ये आतापर्यंत एकूण अर्ज केलेल्या महिलांची संख्या 1 कोटी 80 लाख हुन अधिक आहे.

Majhi Ladki Bahin Yojana List

हे सर्व अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने केले गेलेले आहेत, बऱ्याच महिलांनी अर्ज करून आता बरेच दिवस झालेत त्यामुळे आता महिलांना त्यांची लाभार्थी यादी कधी येणार, माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कुठे पहायला मिळेल, यादीत नाव नाही आले तर काय प्रोसेस करायची हे जाणून घ्यायचे आहे. तर आपण लाभार्थी यादी कशी डाउनलोड करायची आपले नाव कसे पाहायचे हे बघणार आहोत.

माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी

महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यांसाठी माझी लाडकी बहिन योजना २०२४ लाभार्थी यादी जारी केली. महाराष्ट्र राज्यातील सर्व लाभार्थी महिला ज्यांनी माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केला आहे ते आता जाहीर केलेली लाभार्थी यादी तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ऑनलाइन पद्धतीने चेक करून अर्जदार आणि शासन दोघांचाही बराच वेळ वाचू शकतो. अर्जदार जिल्हानिहाय अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपली लाभार्थी यादी ऑनलाइन पाहू शकतात.

माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचा अर्ज दिनांक १४ ऑगस्ट पर्यंत पूर्ण होईल किंवा पूर्ण झालेला असेल व तो अर्ज जर मंजूर झालेला असेल (अप्रूव्ह) झालेला असेल अशा पात्र लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या च्या आधी म्हणजेच १७ ऑगस्टला थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल.

त्यामुळे जर तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण केला असेल आणि आता तुम्ही पात्र असाल किंवा तुमचे नाव पात्रता यादीत असेल, किंवा जर तुमचा अर्ज १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत पात्र होईल तर तुम्हला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे हप्ते मिळून एकूण ३,००० रुपये थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील.

PDF Reader वापरून यादीत नाव कसे पाहावे

जर तुमच्या जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर झालेली आहे आणि तुम्ही ती डाउनलोड केली असेल तर खालील स्टेप्स वापरून तुम्ही यादीत तुमचे नाव पाहू शकता:

गूगल प्ले स्टोअर वरून PDF Reader App डाउनलोड करा.
किंवा जर मोबाईल मध्ये Drive PDF Reader असेल तर चालेल.

डाउनलोड केलेल्या फाईल वरती क्लिक करा आणि Open with PDF Reader निवडा.
वरील कोपऱ्यातील सर्च बटन वर क्लिक करून तुमचे नाव टाका आणि सर्च बटन वर क्लिक करा.

Leave a Comment