Ladki Bahin Yojana e-KYC: महाराष्ट्र शासनामार्फत समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी राज्यपातळीवर विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि महाराष्ट्रातील नागरिकांना त्याचा लाभही मिळतो. महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील २१ ते ६५ वय वर्ष वयोगटातील मुली व महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचे आर्थिक साहाय्य करते.
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे.

Table of Contents
माझी लाडकी बहिण योजना e-KYC का करायची
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात अमलात आणलेली, त्यावेळी सरकारचा उद्देश्य होता कि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा. योजनेसाठी अटी व पात्रता निकष लागू होते पण योजना लागू करण्याच्या घाईत अर्जाची पडताळणी सामान्य पातळीपर्यंत झाली.
निवडणूक झाल्यावर सरकारच्या लक्षात आलं की काही बोगस, चुकीची माहिती भरून लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे ती नावे कमी करण्यासाठी माझी लाडकी बहीण e-KYC प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. इ केवायसी केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी होईल आणि खरंच गरजू लाभार्त्याना योजनेचा फायदा होईल.
- या महिलांनी e-KYC करू नका – नाहीतर चालूचे ₹1500 पण बंद होतील!

- अशाप्रकारे करा लाडकी बहीण योजना e-KYC, 100% यशस्वी होईल

- लाडकी बहीण योजना eKYC करताना येणाऱ्या समस्या आणि उपाय

Ladki Bahin Yojana Online e-KYC Documents
Ladki Bahin Yojana Online e-KYC करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जमा करावे लागत नाही, तर फक्त खालील माहितीची गरज आहे:
- महिलेचा आधार क्रमांक
- पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक
- आधार लिंक मोबाईल नंबर
लाडकी बहिण योजना e-KYC प्रक्रिया
https://ladakibahin.maharashtra.gov.in या Website ला भेट द्या.
मुखपृष्ठावरील eKYC Banner वर Click करा.
eKYC फॉर्म उघडेल लाभार्थीनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड (Captcha) नमूद करावा तसेच, आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून Send OTP बटणावर Click करा.
लाभार्थ्याच्या (Aadhar linked) मोबाईलवर प्राप्त झालेला OTP – OTP स्क्रीनमध्ये टाकून Submit बटणावर Click करा.
OTP सबमिट केल्यानंतर eKYC पेजवर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करुन पडताळणी संकेतांक कोड (Captcha) नमूद करावा तसेच, आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून Send OTP बटणावर Click करा.
नंतर पती/वडील यांच्या (Aadhar linked) मोबाईलवर प्राप्त झालेला OTP – OTP स्क्रीनमध्ये टाकून Submit बटणावर Click करा.
यानंतर लाभार्थ्यानेः-
(i) जात्त प्रवर्ग पर्याय निवडावा.
(ii) खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्यात:-
१) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
(होय / नाही)
२) माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहे? (होय / नाही)
नंतर चेक बॉक्स Click करून Submit बटणावर क्लिक करा.
“Success तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पुर्ण झाली आहे“
असा संदेश येईल.
ladki bahin.maharashtra.gov.in Website
लाडकी बहीण योजनेसाठी ladki bahin.maharashtra.gov.in हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबपेज आहे. जर हि वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये उघडत नसेल तर पुढील स्टेप्स फॉलो करा.
आता सर्व लाभार्थी त्यांची लाडकी बहीण ऑनलाईन ई केवायसी पूर्ण करण्यासाठी ladki bahin.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट देत आहेत, मोठ्या संख्येने लाभार्थी येत आहेत त्यामुळे ladki bahin.maharashtra.gov.in हि वेबसाईट लोड घेत आहे.
ladki bahin.maharashtra.gov.in
तुम्ही वर दिलेल्या लिंक वरून ladki bahin.maharashtra.gov.in वेबसाईट ओपन होते का नाही ते चेक करून शकता, जर सध्या वेबसाईट ओपन होत नसेल तर तुम्ही eKYC कशी करायची या पेज वरती शिफ्ट व्हाल, तिथे तुम्ही लाडकी बहीण योजना ekyc कशी करायची ते बघून ekyc करू शकता.
मागील ३ महिन्याचे (जून, जुलै, ऑगस्ट) पैसे जमा झाले नाहीत
राज्य शासनाने लाडकी बहिण योजना eKYC प्रक्रिया सुरूच यासाठी केली आहे कि ज्या लाभार्थ्यांनी अपूर्ण जाणीव जुनी/चुकीची माहिती भरलेली आहे , तर काहींनी अपात्र असताना देखील योजनेचा लाभ घेतलेला ती नावे eKYC प्रक्रियेद्वारे वगळली जातील.
तुमच्या माहितीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यामुळे तुम्हाला मागील तीन महिन्याचे हप्ते मिळाले नसतील. परंतु आता तुम्ही eKYC केल्यावर जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुम्हला हप्ते मिळायला चालू होतीलच त्याचबरोबर मागील हप्त्याचे पैसे देखील मिळतील.
माझी लाडकी बहीण योजना e-KYC FAQ
माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करायची?
e-KYC तुम्ही स्वतः घरी बसून करू शकता, ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जाऊन दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
माझी लाडकी बहीण योजनेचे मागील हप्ते मिळाले नाहीत?
लाडकी बहीण योजना स्टेटस चेक करा किंवा ग्रेव्हीएन्स फॉर्म भरा आणि e-KYC करा.
e-KYC नाही केली तर काय होईल?
जर तुम्ही e-KYC नाही केली तर तुम्हाला मिळणारा योजनेचा लाभ बंद होईल.
e-KYC केल्यावर योजनेचा लाभ बंद होईल का?
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रता निकषात बसत असाल तर तुम्हाला चिंता कराची गरज नाही.
महिन्याला २१०० रुपये कधीपासून मिळणार?
e-KYC मध्ये जर जास्त लाभार्थी बाद झाले तर उरलेल्या महिलांना महिन्याला २१०० रुपये मिळू शकतील.