या महिलांनी e-KYC करू नका – नाहीतर चालूचे ₹1500 पण बंद होतील!

या महिलांनी e-KYC करू नका नाहीतर चालू लाभ पण होईल बंद: काही दिवसांपासून लाडकी बहिण योजनेची e-KYC सुरू झालेली आहे. e-KYC प्रक्रिया सुरु झाल्यापासून काही महिलांनी e-KYC केलेली देखील आहे. अजून देखील भरपूर प्रमाणात महिला अशा आहेत ज्यांची e-KYC करणं बाकी आहे.

👉अशाप्रकारे लाडकी बहीण योजना e-KYC केली तरच पुढचे हप्ते मिळतील👈

आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती अशी आहे कि जरी तुम्ही लाडकी बहीण योजना e-KYC केली तरी देखील तुमचा हप्ता जो आहे तो बंद होऊ शकतो. अशा भरपूर महिला आहेत की त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे. आता त्या महिला कोणकोणत्या आहेत नक्की काय होणार आहे आणि कोणत्या महिलांनी e-KYC करू नका हे योग्य आहे का ते समजून घेणार आहोत.

e-KYC करताना अडचणी येत आहेत?

महिलांनी e-KYC करू नका

महिलांनी e-KYC करू नका असं का म्हणत आहेत

महिलांनी e-KYC करू नका अस म्हटलं जात आहे कारण e-KYC करताना मागितलेला आहे तो म्हणजे तुमचा आधार नंबर आणि त्यासोबतच विचारलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर. जर तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार नंबर आणि लग्न नसेल झालं तर वडिलांचा आधार नंबर (ज्यांचे नाव तुमच्या आधार कार्ड वर आहे त्यांचा).

👉अशाप्रकारे लाडकी बहीण योजना e-KYC केली तरच पुढचे हप्ते मिळतील👈

आता हा पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर आहे तो दिल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये काय काय आहे हे सगळं चेक होणार आहे. त्यांचा आधार कार्ड वरून कुटुंबाची सर्व माहिती मिळणार आहे आणि त्यामुळे काही महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहेत, त्या महिलांना इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत.

e-KYC केली तर या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत

आता काही अशा महिला असतील ज्या की e-KYC केली तरी अपात्र होतील व त्यांना हप्ता मिळणार नाही. यासाठी कोणकोणती कारणे असतील तर ते इथे समजून घ्या:

मुख्य कारण म्हणजे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
याचाच अर्थ काय तर तुमचं रेशन कार्ड आहे त्यामध्ये एका रेशन कार्डवर फक्त एकच विवाहित किंवा विधवा असेल म्हणजे एकच महिला आणि एकच मुलगी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकते. त्यामुळे जर एकूण २ पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असतील तर मात्र तुमच्या कुटुंबातील महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे.

त्यानंतर आता किमान वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ मिळणार आहे. काही महिलांनी त्यांचं वय वाढवून किंवा कमी करून टाकले होते तर त्यांचा लाभ आता बंद होईल आणि आधार कार्ड नुसार तुमचं वय घेतल जाईल.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे. ते जास्त नसावे. कुटुंब म्हणजे तुमचं पूर्ण रेशन कार्ड येत आणि या रेशन कार्ड मध्ये जे काही सर्विस वगैरे कोणी नोकरीला असेल तर लक्षात ठेवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न इथे नसलं पाहिजे.

त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच कारण म्हणजे कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य (ITR) इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात तर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्ड वरून समजेल की कोण कुटुंबामध्ये आयटीआर भरते त्यामुळे अशा महिला लगेच सापडणार आहे त्यामुळे तुम्ही e-KYC जरी केली तरी तुमचा हप्ता जो आहे तो लगेच बंद होईल, म्हणून महिलांनी e-KYC करू नका.

त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या कोणत्याही संस्थेमार्फत काम करतात सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेतात तर तुमचा हप्ता बंद होईल.

त्यानंतर ज्या लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या आर्थिक योजनेचा दर महा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ १५०० मधून वजा करून जेवढी रक्कम उरते तेवढीच रक्कम दर महिन्याला मिळणार आहे.

१. अशा महिला आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही कारण त्यांना ₹2500 पेन्शन ही जमा होत आहे.

२. ज्या काही महिला PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र ₹500चा जो काही फरक आहे तो इथे भेटणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ते आता तुम्ही पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिला आहे. त्यांचा आधार क्रमांक चार चाकी बरोबर RTO मध्ये रजिस्टर असणार आहे त्यामुळे तुम्ही e-KYC करून काही फायदा होणार नाही, म्हणून महिलांनी e-KYC करू नका. e-KYC केली तर त्यांना कळणार आहे तुमच्याकडे काय आहे त्यापेक्षा e-KYC न केलेली परवडेल.

👉अशाप्रकारे लाडकी बहीण योजना e-KYC केली तरच पुढचे हप्ते मिळतील👈

मागील महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत

राज्य शासनाने लाडकी बहिण योजना eKYC प्रक्रिया सुरूच यासाठी केली आहे कि ज्या लाभार्थ्यांनी अपूर्ण जाणीव जुनी/चुकीची माहिती भरलेली आहे , तर काहींनी अपात्र असताना देखील योजनेचा लाभ घेतलेला ती नावे eKYC प्रक्रियेद्वारे वगळली जातील.

तुमच्या माहितीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यामुळे तुम्हाला मागील तीन महिन्याचे हप्ते मिळाले नसतील. परंतु आता तुम्ही eKYC केल्यावर जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुम्हला हप्ते मिळायला चालू होतीलच त्याचबरोबर मागील हप्त्याचे पैसे देखील मिळतील.

Leave a Comment