Majhi Ladki Bahin Yojana Online Apply – ladki bahin maharashtra gov in: महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वय वर्ष वयोगटातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलैपासूनच अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य सरकार च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजने द्वारे राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना व मुलींना दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यात जमा करणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जवळपास १ कोटींहून अधिक अर्जदारांनी ऑनलाईन नारी शक्तीदूत अॅप च्या माध्यमातून किंवा ऑफलाईन सेतू / अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अर्ज भरलेले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज सुरु झालेत आणि हि अर्जप्रक्रिया आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आणि अर्जप्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ओंलीने पोर्टल देखील सुरु केलेले आहे.या पोस्ट च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टल च्या माध्यमातून कसे अर्ज करू शकतो ते पाहणार आहोत.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply – Ladkibahin.maharashtra.gov.in
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जवळपास १ कोटी ८५ लाखांहून अधिक अर्जदारांनी ऑनलाईन नारी शक्तीदूत अॅप च्या माध्यमातून किंवा ऑफलाईन सेतू / अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अर्ज भरलेले आहेत. परंतु या पद्धतीने अर्ज करताना त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत होत त्यावर समाधान म्हणून आता दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून ladkibahin.maharashtra.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरु केलेल आहे.
सर्वप्रथम तुम्हाला कोणताही वेब ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे जस कि गूगल क्रोम, आणि यामध्ये सर्च करायचं आहे ladki bahin maharashtra gov in किंवा ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाइट वरती व्हिजिट करायचं आहे.
इथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी विविध प्रकारची माहिती दिसेल जसे पोर्टल वर प्राप्त एकूण अर्जाची संख्या, पोर्टलवरून मंजूर अर्जाची एकूण संख्या आणि पोर्टल वरून एकूण लाभार्थ्यांची संख्या.
त्याचबरोबर अर्जप्रक्रियेविषयी देखील माहिती बघायला मिळेल.
- Majhi Ladki Bahin Yojana List 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी
- Majhi Ladki Bahin Yojana Online Apply – लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा
ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टल च्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- १. आधार कार्ड – अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे
- २. अधिवास प्रमाणपत्र – प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
- ३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास – पतीचे(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
- ४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
- अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- ५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास – विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
- ६. बँक खाते तपशील(खाते आधार लिंक असावे)
- ७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
Majhi Ladki Bahin Yojana Application Process – लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्जप्रक्रिया
ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाइट वरती यावं.
Step 1: तुम्हाला वरील मेनू बार मध्ये दिसणाऱ्या अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे.
अर्जदार लॉगिन बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही जर अगोदरच या पोर्टल वरती खाते उघडले असेल तर डायरेक्ट तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिसणाऱ्या खाते नाही – खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करा.
Step 2: नवीन अर्जदार नोंदणी – नवीन खाते तयार करा
खालील फॉर्म मध्ये तुम्हाला सर्व माहिती अचूक भरायची आहे आणि आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे. माहिती भरून झाल्यावर कॅप्चा पूर्ण करा व सबमिट बटनावर क्लिक करा.
आता खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हला आलेला ऑटीपी टाका आणि व्हेरिफाय ऑटीपी बटन वर क्लिक करून सबमिट करा. तुमचे खाते यशस्वीरीत्या उघडले जाईल.
आता तुम्हला आधी टाकलेल्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करावे लागेल. स्टेप १ मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही आताच बनवलेल्या खात्याचे डिटेल्स म्हणजे मोबाइलला नंबर आणि पासवर्ड टाऊन लॉगिन करून घ्यावे
Step 3: अर्जप्रक्रियेला सुरुवात
लॉगिन केल्यानंतर नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तिथे तुम्हला मेनू बार मध्ये विविध पर्याय दिसतील
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज – याच्यावर क्लिक करून नवीन अर्ज करू शकता.
योजना – शासनाच्या इतर योजनांची माहिती.
यापूर्वी केलेले अर्ज – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेले अर्ज आणि त्यांचा स्टेटस.
प्रोफाइल – अर्ज भरणाऱ्याची प्रोफाइल (अर्ज कोणीही भरू शकते).
योजनेची माहिती – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी माहिती.
लॉगआउट – पोर्टल वरून बाहेर पडणे.
नवीन अर्ज भरायला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदाच दिसणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Step 1. अर्जदाराचा आधार नंबर टाकून सबमिट करावे.
Step 2. आलेला ऑटीपी टाकून सबमिट करावे.
आता नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हला नोंदणी अर्ज असे दिसेल.
आता तुम्हाला तुमचा नोंदणी अर्ज अचूक पद्धतीने भरायचा आहे.
स्टेप बाय स्टेप तुमची माहिती भरत जा.
डॉक्युमेंट व्यवस्थित स्पष्ट दिसावे असे असले पाहिजे म्हणजे अर्ज रिजेक्ट होणार नाही.